सलीम खान यांनी केलेली तक्रार बिन बुडाची... सत्य घटना तपासून सलीम खानवर कारवाई व्हावी...गट मालक कादिर खान यांची पत्रकार परिषदेत मागणी
भडगाव [ प्रतिनिधी ]....सुभाष ठाकरे..
.शहरातील टोणगाव शिवारातील गट क्रमांक ५६१/१ मध्ये शेकडो झाडांची अनधिकृत तोड सुरू आहे. ही घटना फक्त एका गावापुरती मर्यादित नसून, संपूर्ण समाजाच्या पर्यावरणाबद्दलच्या उदासीनतेचे जिवंत उदाहरण ठरत आहे.
या वृक्षतोडी संदर्भात सलीम सखावत खान यांनी भडगाव तहसीलदार यांना लेखी तक्रार दिली होती. परंतु सलीम सखावत खान यांनी यासंदर्भात कुठल्याही प्रकारचे चौकशी न करता परस्पर तक्रार दाखल करून संबंधित गट मालक कादिर खान हाजी जोरावर खान यांना मानसिक त्रास देण्याच्या हेतूने दिल्या बाबत त्यांनी आज रोजी भडगाव शहरातील मध्यस्थानी असलेल्या सुंदरबन या फार्मच्या ठिकाणी आज दिनांक 22 ऑक्टोबर 2025 सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेऊन घडलेल्या घटनेची माहिती देत खुलासा केला की सदर वृक्षतोड साठी आम्ही भडगाव नगरपरिषद तसेच वन विभाग यांच्याकडून रितर्स रित्या परवानगी घेतले असून तक्रारदार यांनी 200 ते 300 झाड तोडल्या असल्याचा आरोप केला होता व अस्तित्वात 14 ते 15 झाडे या ठिकाणी होते व ते देखील वन विभाग वनपरिक्षेत्राधिकारी सरिता पाटील वनपाल नंदू पाटील व भडगाव नगरपरिषद मुख्याधिकारी रवींद्र लांडे व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष स्थळी येऊन झाडांचा पंचनामा केला होता तसेच लाकूड वाहतुकीसाठी वाहतूक परवाना देखील घेतला असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. यावेळी त्यांच्यासोबत हाजी जाकीर कुरेशी व बब्बू सेठ उपस्थित होते. अशा खोट्या आरोप करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई व्हावी असे त्यांनी यावेळी सांगितले
Post a Comment