मिलन हॉटेल् मधील भयानक स्फोटाने भडगावकर हादरले.
भडगाव (वार्ताहर).. सुभाष ठाकरे..
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असलेल्या हॉटेल मिलन मध्ये आज दुपारी अचानक डी.फ्रिजचा भीषण स्फोट होऊन संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत हॉटेल चालकाचा मुलगा सोहिल मणियार, भडगाव शहरातील रवी सोनवणे तसेच पुणे येथील पाच ग्राहक गंभीर जखमी झाले आहेत.
स्फोटानंतर हॉटेलमध्ये आगीचा भडका उडाला तात्काळ नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना प्रथम उपचारासाठी भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सर्वांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी पाचोरा येथे हलविण्यात आले.
. अपघाताची माहिती मिळताच आमदार किशोर आप्पा पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली. तसेच रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज जाधव यांना आवश्यक सूचना दिल्या. दरम्यान, जखमींच्या नातेवाईक, मित्रपरिवार आणि शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने मदतकार्य हाती घेतले असून घटनास्थळी तातडीने बचाव कार्य सुरू आहे.
या भीषण अपघातामुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. दुर्घटन नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Post a Comment