लाडगाव तासखेडा येथील नदी पात्रातील रेती उचल पुन्हा सुरू..
मारवड ग्रामीण (प्रतिनिधी.)
दिनांक 23 जुलै 2025 रेती चोरी कारवाई मध्ये दोन टेम्पो जप्त केले ,तरी तहसीलदारांच्या कारवाईला न जुमानता प्रशासनाच्या नाकावर टिच्चून रेती माफिया दुसऱ्या दिवशी पुन्हा सक्रिय झाल्याचे दृष्टीस पडत आहे. सर्व दूर रेतीचे टेम्पो तसेच ट्रॅक्टर सकाळपासून लाडगाव नदीपात्रात उतरलेले दिसत आहेत. या प्रकारावरून असे निदर्शनास येते की त्या नदीपात्राच्या वर कोणीही पोलीस पाटील किंवा महसूल सेवक कार्यरत नाही .किंवा कार्यरत असेल तर त्यांच्या कृपा आशीर्वादाने तर रेती उचल सुरू नाही असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. लाडगाव चे पोलीस पाटील श्री सोनवणे यांचा या प्रकारामध्ये काही हात आहे का? कारण त्यांच्या मर्जीशिवाय एवढे मोठे धाडस गौण खनिज उत्खनन करण्यासाठी कोणी करणार नाही? की पोलीस पाटील तहसीलदार साहेबांच्या आदेशाला जुमानत नाही .?असे अनेक प्रश्न निर्माण होतात. जबाबदार अधिकाऱ्यांना ज्या ठिकाणी बैठी पथकाला नेमून देण्यात काय हरकत आहे ?हा प्रश्न सुद्धा नागरिकांमध्ये सुरू आहे. कारण त्या रस्त्याने प्रवास करणारे शेकडो नागरिक या रेतीच्या टेम्पो आणि रेतीच्या ट्रॅक्टर मुळे अपघात होण्यास घाबरत असतात. कारण अनेक वेळा विना नंबरचा, कागदपत्राच्या टेम्पो च्या धडक बसल्यामुळे अनेक वेळा गंभीर अपघात झालेले आहेत. अशा बिना नंबरच्या टेम्पो पोलीस प्रशासनाला दिसत नाहीत का? रेती टेम्पोच्या अपघातात एकदा बापू नगराज पाटील नावाचे विप्रो कंपनीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून असलेले हे बेशुद्ध पडले होते व त्यांच्या तोंडाला 36 टाके पडले होते. रेती टेम्पो चा वाहक येथून पळून गेला होता. किंवा त्याच्या दहशतीमुळे कोणीही तक्रार केली नाही. म्हणून नाहक त्या माणसाला लाखोचा खर्च झाला होता व त्याला कायमस्वरूपी नोकरी गमवावी लागली. असे अनेक प्रकार घडले असताना रेती चोरांची एवढी मग्रुरी का वाढली ? किंवा त्यांना पैसे कमवण्या वाचून दुसरे काही सुचत नाही .आणि पैशांपुढे प्रवाशांचा जिवाचा धोका यांच्याशी त्यांना काही घेणे देणे नाही .किंवा त्यांच्यावर कोणाचा वरदहस्त आहे? रेती चोरांना आवर घालावा ही प्रशासनाची जबाबदारी आहे.
Post a Comment