आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस स्टेशन तर्फे भडगाव शहरात पोलीसांचे रुट मार्च
भडगाव प्रतिनिधी - सुभाष ठाकरे
दि.०१/०४/२०२३
भडगांव:- आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस स्टेशन तर्फे शहरात पोलीसांचे रुट मार्च काढण्यात आला.
भडगाव शहरात श्रीराम रथोत्सव, महावीर जयंती, हनुमान जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच रमजान सणाचे अनुषंगाने पोलीस स्टेशन पासून मेन रोड, सराफ पट्टा, आझाद चौक, मेढ्या मारुती टोणगाव, समर्पण हॉस्पिटल बाळद रोड, पारोळा चौफुली, बस स्थानक ते पोलीस स्टेशन पर्यंत असा रूटमार्च घेण्यात आला. हा रूट मार्च भडगाव पोलीस स्टेशन हद्दीत काढण्यात आला. या वेळीं पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर, २५ पोलीस अंमलदार, ३० होमगार्ड, एक आर. सी. पी प्लाटुन आदी कर्मचारी रूट मार्च वेळीं हजर होते. अशी महिती गोपनीय विभागाचे स्वप्नील चव्हाण व विलास पाटील यांनी दिली.
Post a Comment