ad headr

Powered by Blogger.

भडगाव येथे उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसेना युवासेनेचे अनोखे आंदोलन...


भडगावः- तालुक्यातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी यांनी शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आपल्या रक्ताने पत्र लिहुन तालुक्यातील शिवसेना, युवासेना पदाधिकारी यांचा पाठीबा दर्शविला आहे. या अनोख्या आदोंलनामुळे संपुर्ण तालुक्याचे लक्ष वेधले गेले आहे. तालुक्यातील काही प्रमुख पदाधिकारी मात्र या आंदोलनात सहभागी न होता आंदोलना पासुन लांब होते. या आंदोलनापासुन राहिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
       राज्यात अभुतपुर्व राजकीय घमासान सुरु आहे. शिवसेना आमदार एकनाथ शिंदे गटात सामिल होण्यापासुन ते शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण वर हक्क सांगण्यापर्यत चढाओढ सुरु आहे. असे असताना आम्ही शिवसेना सोबत आहोत, शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी तालुक्यातील निष्ठावान शिवसैनिक आज शासकीय विश्रामगृह आवारात एकवटले होते. या ठीकाणी उपस्थित शिवसैनिकाना जे के पाटील, गोरख पाटील, शेतकरी सेनेचे अनिल पाटील, महिला आघाडीच्या पुष्पाबाई परदेशी यांनी मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर विश्रामगृह ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रॕली काढण्यात आली. त्याठीकाणी "उध्दवसाहेब आगे बढो...हम तुम्हारे साथ है..., शिवसेना आमच्या हक्काची.. नाही कुणाच्या बापाची, गेले ते कावळे.. राहिले ते मावळे... अश्या विविध विविध घोषणा या ठीकाणी देण्यात आल्या. यामुळे हा परीसर घोषणांनी दणाणुन गेला होता. त्यानंतर युवासेना जिल्हा सरचिटणीस लखिचंद पाटील, निलेश पाटील, रघुनंदन पाटील यांनी आपल्या रक्ताने लिखाण करून शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांना पाठीबा दर्शविणारे पत्र लिहण्यात आले.
       यावेळी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी, विधानसभा क्षेत्र प्रमुख जे के पाटील, युवा सेनेचे जिल्हा सरचिटणीस लखिचंद पाटील, उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील, जिल्हा समन्वयक अनिल पाटील, वैद्यकीय आघाडीचे डॉक्टर प्रमोद पाटील, माजी नगरसेवक शंकर मारवाडी, माजी शहरप्रमुख मनोहर चौधरी, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष गोरख पाटील, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख अमृत पाटील, उपतालुकाप्रमुख अशोक पाटील, महिला आघाडीच्या पुष्पाताई परदेशी, नरेश पाटील, राजू शेख, विश्वास पाटील, युवा सेनेचे शहरप्रमुख बंटी सोनार, माधव जगताप, चेतन भोई, वलवाडी चे बाबाजी पाटील, प्रभाकर पाटील, गुलाब पाटील, भाऊसाहेब पाटील शिवशक्ती-भीमशक्ती चे तालुकाप्रमुख शैलेश मोरे पळासखेडे ईश्वर राजपूत, प्रशांत गालफाडे, पप्पू पाटील, भोला पाटील, बबलू पाटील, कनाशी चे बाबाजी पाटील, स्वपनील पाटील, सुरेश बैरागी वडगावचे राजेंद्र पाटील उपशहरप्रमुख चेतन पाटील, अनिल महाजन, आबा महाले भोरटेक, आदी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 

       भडगाव येथिल युवासेना जिल्हा सरचिटणीस लखिचंद पाटील, निलेश पटील, रघुनंदन पाटील यांनी आपल्या रक्ताने लिखाण करत शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठीबा दिला. यात ते लिहतात की, सन्मानीय उध्दवसाहेब आम्ही, तुमच्या पाठींशी आहोत. तुम्ही फक्त लढा ! आम्ही आमच्या स्वतःच्या रक्ताने पत्र लिहुन रक्त बलिदान करीत आहोत. आम्ही सर्व शिवसैनिक आपल्या सोबत असुन हे रक्ताने लिहलेले पत्र हाच आमचा पाठीबा समजावा.....
शिवसैनिक
ग्रामीण व शहर, भडगाव तालुका, जि. जळगाव


              भडगाव प्रतिनिधी - सुभाष ठाकरे

No comments